WI vs PAK : विंडीज मालिका जिंकत पाकिस्तानचा हिशोब करणार? आज निर्णायक सामना
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना आज (१२ ऑगस्ट) ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे.
सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करणार आहे.
पाकिस्तानने याआधी झालेल्या ३सामन्यांच्या टी-२० मालिकेत विंडीजवर २-१ ने मात केली होती.
त्यामुळे विंडीजकडे वनडेत विजय मिळवत पाहुण्यांचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे.
सामन्याची वेळ आणि ठिकाण
दिनांक : १२ ऑगस्ट, मंगळवार
स्थळ : ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद
टॉस : संध्याकाळी६:३० (भारतीय वेळेनुसार)
सामना सुरू : संध्याकाळी ७:00
थेट प्रक्षेपण
भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण नाही
मोबाईलवर सामना FanCode अॅपवर थेट पाहता येईल
कर्णधार
वेस्ट इंडिज : शाई होप
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान
आजचा सामना केवळ मालिकेचा निर्णय करणार नाही, तर टी-२० पराभवानंतर विंडीजला प्रतिष्ठा वाचवण्याची संधी देणार आहे.
आता पाहावे लागेल, पाकिस्तान सलग दुसरी मालिका खिशात टाकतो का, की विंडीज पाहुण्यांचा हिशोब बरोबर करते.