वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाविरुद्ध अकोल्यात शांततापूर्ण दिवाबंदी आंदोलन

वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाविरुद्ध अकोल्यात शांततापूर्ण दिवाबंदी आंदोलन

अकोला | प्रतिनिधी

वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाच्या विरोधात मुस्लिम बांधव आणि बहुजन समाजाच्या वतीने

अकोल्यात शांततेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या

Related News

या वादग्रस्त विधेयकाच्या विरोधात आज रात्री ९:०० ते ९:१५ वाजेपर्यंत १५ मिनिटांसाठी घर,

दुकान, कारखाने आणि कार्यालयांतील दिवे बंद ठेवून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला.

काय होती आंदोलनाची मागणी?

या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारने सादर केलेले वक्फ बोर्ड संशोधन विधेयक तात्काळ मागे घ्यावे,

अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आंदोलन पूर्णपणे ऐच्छिक आणि शांततेत पार पडले, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

एकजुटीचे दर्शन

या अनोख्या दिवाबंदी आंदोलनात मुस्लिम समाजासोबत इतर बहुजन समाज घटकांनीही सहभाग घेतला,

ज्यातून या विधेयकाविरोधातील सामूहिक नाराजीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या निषेधाचा संदेश देण्यात आला.

विधेयकाविरोधातील शांततापूर्ण, अहिंसात्मक आणि अनुशासित आंदोलनामुळे अकोल्यातील नागरिकांनी सामाजिक

ऐक्याचा आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण दिला आहे.

केंद्र सरकारने या आवाजाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtra-dinimitta-akol-akol-darsh-flag-hoisting/

Related News