Walmik Karad Beed Crime: वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलीवूड इंडस्ट्रीत गुंतवला? फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचं कार्ड सापडलं, बीड पोलीसही चक्रावले

Walmik Karad Beed Crime: वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलीवूड इंडस्ट्रीत गुंतवला? फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचं कार्ड सापडलं, बीड पोलीसही चक्रावले

Walmik Karad Crime Beed: या प्रकरणात वाल्मिक कराडचे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत याचे नवनवे पुरावे दररोज समोर येत आहेत.

Walmik Karad : गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर स्थिरावलेला आहे .

औष्णिक वीज केंद्राच्या राखीभोवती फिरणारा आणि खंडणी ते हत्तेपर्यंतचा सारा घटनाक्रम साऱ्यांसमोर अगदी लख्ख आहे. दरम्यान, या प्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचा समोर येत आहे .

Related News

वाल्मिक कराडचे (Walmik Karad) आयडी कार्ड आता सोशल मीडियावर चांगलं व्हायरल होत आहे .

या कार्डवर इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा तो सभासद असल्याचं समोर आल्याने आता पोलीसही चक्रावले आहेत .

(Beed Crime) वाल्मिक कराडचा राखेच्या अवैध धंद्यातून आणि खंडणीतलून आलेला सगळा पैसा त्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीत गुंतवलाय काय?असा सवाल उपस्थित होतोय.

वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर !

बीड मधील बहुतांश राजकीय आणि इतर कार्यक्रमांच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग असणारा वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर असल्याचं समोर येत आहे .

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे आयडी कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .या आयडी कार्डवर इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा वाल्मिक कराड एक सभासद असल्याची नोंद आहे .

या कार्डवर वाल्मीक बी आर जे फिल्म प्रोडक्शन चा आजीवन सभासद असल्याची नोंद या कार्डवर असून त्याचा मेंबर नंबर 23480 असा आहे .

बीड मधील वाल्मीक कराडची दहशत आणि राजकीय सभांमधील त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटची चर्चा असताना वाल्मीक कराडचे कनेक्शन आता फिल्म लाईनपर्यंत जाऊन थांबले आहे .

काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी टीका करतानाही वाल्मिक कराडच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख केला होता.

या प्रकरणात वाल्मिक कराडचे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत याचे नवनवे पुरावे दररोज समोर येत आहेत.

आता तर वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर असल्याचे आयकार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बीड पोलीसही चक्रावले आहेत.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case) आता 100 दिवस उलटून गेलेत.

मात्र हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

विष्णू चाटेने खंडणीसाठी 29 नोव्हेंबर 2024 रोजी साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दोनवेळा फोन केल्याचंही समोर आलं होते.

नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता.

संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे सीआयडीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.

Related News