बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी घडलेल्या धक्कादायक घटनेत मोकाट कुत्र्यांनी तब्बल ३० जणांना चावा घेतला. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
वाडेगाव हे तालुक्यातील मोठे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने येथे दररोज बाहेरगावाहून नागरिकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः बसस्थानक परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून आठवड्यातून एखाद्या नागरिकाला चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी तर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या एका तासात सहा जणांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक भयभीत झाले आहेत.
गावातील चिकन, मटन व मासे विक्री केंद्रांमधील उरलेला कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने कुत्र्यांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच अकोला महानगरपालिकेचे कर्मचारी शहरातील कुत्रे पकडून ग्रामीण भागात सोडत असल्याचीही चर्चा असून या प्रकारामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Related News
कल्याण-डोंबिवलीत 27 गावांचा एल्गार! क्लस्टर योजनेविरोधात भूमिपुत्रांचा पालिकेवर मोर्चा, सरकारविरोधात संताप
पालकांची भीती; 12 वर्षांच्या मुलाने रचला अपहरणाचा बनाव, भंडाऱ्यातील पवनीतील धक्कादायक प्रकार
मूर्तिजापूरमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीचे चाक चोरीला; तक्रार नाही, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
जानोरी मेळघाटमध्ये बोटीद्वारे वाळू उत्खनन सुरू; बाळापूर तहसील प्रशासनावर दुर्लक्षाचे आरोप
अकोट–अकोला मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला
Bhiwandi Dog Bite Tragedy: 22 दिवसांनी 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय चुकलं? 7 धक्कादायक तथ्ये
श्री जागेश्वर विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
आजपासून मराठा पाटील समाजसंवाद पदयात्रेला प्रारंभ १७ ते २६ जानेवारीदरम्यान काजीखेड–वाडेगाव समाजजागृतीचा प्रवास
मांजाने युवकाचा गळा चिरला; दुचाकीस्वार गंभीर जखमी
Jijau Swami Vivekanand Jayanti ZP School | जि.प. शाळेत जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
पशुवैद्यकीय विभाग झाला जागा; त्वचा रोगग्रस्त कुत्र्यांचा प्रश्न मात्र कायम
डोणगाव परिसरातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह
गेल्या महिन्यात उरळ येथे एका महिलेला कुत्र्यामुळे त्वचारोगाचा संसर्ग झाल्याची घटना घडली होती. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप होत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. वाडेगावातील पशु रुग्णालय केवळ नावालाच आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे, तसेच त्यांचे लसीकरण व निर्बिजीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
