“मतदान चोर, खुर्ची सोड” — अकोल्यात काँग्रेसचा कॅन्डल मार्च
अकोला- मतदार यादीतील कथित फेरफार आणि गैरप्रकारांविरोधात अकोला महानगर काँग्रेस कमिटीने गुरुवारी सायंकाळी भव्य कॅन्डल मार्च मोर्चा काढला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेतून मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
Related News
काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदार यादीत फेरफार करून गैरमार्गाने सत्ता मिळवल्याचा आरोप केला आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून अकोल्यात “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणांनी वातावरण दणाणले. मोर्चाची सुरुवात स्वराज्य भवन येथून सायंकाळी सात वाजता झाली.
कार्यकर्त्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत निदर्शने करत लोकशाही व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी केली.
मोर्चाचे नेतृत्व आमदार साजिद खान पठाण यांनी केले. यावेळी डॉ. प्रशांत पाटील वानखेडे, प्रकाश तायडे, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, अक्षय राऊत, महेंद्र गवई, पराग कांबळे, फजलू पहेलवान, कपिल रावदेव, मोहम्मद इरफान, मोईन खान, आशिष पांडे, फिरोज गवळी, गणेश कळसकर, दत्ता डिक्कर, सैय्यद शहजाद, पंकज वाढवे, सचिन तिडके, विनोद मराठे, हनिफ भाई, नवेद गवळी, असिफ खान, समीर बरतनवाले, रेहमान बाबू, प्रशांत प्रधान, संदेश वानखेडे, सुनिल वानखेडे, मो. नौशाद, तश्वर पटेल, अब्दुल्ला, वसिम खान, विजय देशमुख, सकावत शहा, अतुल अमानकर, अक्रम भाई आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी “लोकशाहीचे रक्षण करा”, “मतदार यादीतील घोटाळे थांबवा” अशा घोषणाही दिल्या.
काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/charital-vahatukit-shaist-aana/
