सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रात पुण्यातील पर्यटक फिरण्यासाठी आले होते.
पण पाण्यात गेलेल्यांचा समुद्रातील खोलीचा अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटना घडली आहे.
सिंधुदुर्ग : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळील तारकर्ली समुद्र किनारी दुर्देवी घटना घडली आहे.
तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले असल्याची घटना समोर आली आहे.
पाच पर्यटकांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व पर्यटक पुणे येथील असल्याची माहिती मिळत आहे.
Related News
यावेळी तारकर्ली समुद्र परिसरात असलेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी
घटनास्थळी धाव घेतली आणि पाचपैकी तीन पर्यटकांना वाचवण्यात त्यांना यश आलं आहे.
वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांच्या अथक प्रयत्नांनी तिघांचा जीव वाचला,
पण दुर्दैवाने दोघांना वाचवता आलं नाही. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे),
रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) या दोघांना मृत्यू झाला आहे.
तर ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इतर दोन पर्यटकांनाही वाचवण्यात यश आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पर्यटकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आलं आहे.
एमटीडीसीच्या तारकर्ली समुद्रकिनारी पुणे येथील हे पर्यटक
आज शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले होते.
यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्या झाल्याने ते पाण्यात बुडू लागले.
ही घटना जवळच असलेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी पाहिली आणि पुण्याच्या त्या तरुणांच्या मदतीसाठी धाव घेतली.
हे वॉटर स्पोर्ट्सचे तरुण बचावलेल्या पर्यटकांसाठी देवदूत ठरले आहेत.
घटनास्थळी मालवण तालुका प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ जीवरक्षक मदत कार्यासाठी दाखल झाले होते.
वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांमुळे वाचला तिघांचा जीव
MTDC तारकर्ली येथील रांजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी झिलू चव्हाण, निलेश राऊळ,
नरेश टिकम, राजन तारी, भाई आजगावकर, कुमार राठोड तसंच प्रतीक कुबल यांचे
वॉटर स्पोर्ट सहकारी कौशल कुबल, प्रथमेश कुबल, रोहित कुबल, हर्षल कुबल,
महेश कुबल, सर्वेश धुरत, वैभव तळवडकर, दिलीप बांदेकर, नागेश देऊलकर,
निहाल आडकर यांनी पुण्याच्या तीन तरुणांना वाचवलं.
एकूण पाच पर्यटक पाण्यात आंघोळीला गेले होते. त्यापैकी तिघांना पाण्यातून बाहेर काढून त्यांना प्रथमोपचार दिले.
पुढे रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात पाठवलं. प्रथमेश कुबल या तरुणाने
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्याच्या तळाशी जात एकाला वर काढलं,
मदत कार्यात स्थानिकांसह जय गणेश स्कुबा, गजानन स्कुबा,
विक्रांत स्कुबा यांनी देखील सहकार्य केलं. यांच्यामुळेच तिघांचा जीव वाचला, पण दुर्दैवांने दोघांना वाचवता आलं नाही.
आणखी वाचा
https://ajinkyabharat.com/king-vina-ladhanar-army-virat-kohli-pakistanwir/