मुंबई | ९ मे :
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली
याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर एक भावनिक
Related News
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
पोस्ट शेअर करत त्याने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी प्रवासाला अलविदा म्हटलं.
कोहलीने लिहिले, “१४ वर्ष झाले जेव्हा मी पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू जर्सी घातली होती.
खरं सांगायचं झालं, तर मला कल्पनाही नव्हती की हा प्रवास मला कुठे घेऊन जाईल.
टेस्ट क्रिकेटने मला तपासलं, घडवलं आणि जीवनभर उपयोगी येणारे धडे शिकवले.”
तो पुढे म्हणाला, “मी नेहमीच माझ्या टेस्ट करिअरकडे हसत हसत पाहीन.”
कोहलीच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमध्ये एक पर्व संपले असल्याचे मानले जात आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात ऐतिहासिक विजय मिळवले, आणि त्याच्या फलंदाजीने अनेक सामने वाचवले.
कोहलीचा कसोटी कारकिर्दीचा आढावा :
-
टेस्ट सामने : 113
-
धावा : 8848
-
शतकं : 29
-
सरासरी : 49.15
-
कर्णधार म्हणून कसोटी विजय : 40 पैकी 24 विजय
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही घोषणा भावनिक ठरली असून, सोशल मीडियावर
चाहत्यांकडून विराटच्या कारकिर्दीला सलाम केला जात आहे.