विनोद कांबळी आज 18 जानेवारीला 53 वर्षांचा झाला. सध्या विनोद कांबळीचा संघर्ष सुरु आहे. विनोद कांबळीची आजची स्थिती पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करतायत. विनोदच्या करिअरची
सुरुवात जितकी दमदार झाली, शेवट तितकाच वाईट झाला. विनोदने त्याच्या बर्थ डे च्या दिवशीच कधीही न विसरता येण्यासारख एक काम केलं होतं. विनोद कांबळीसाठी आजचा दिवस खूप खास आहे.
कारण आजच्याच दिवशी त्याचा जन्म झाला होता. 1972 चा जन्म असलेला विनोद कांबळी आज 53 वर्षांचा झाला आहे. विनोद कांबळीसाठी ही तारीख काही दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा खास आहे.
Related News
18 जानेवारीलाच विनोद कांबळीने अशी काही कमाल केली होती की, तो कधी विसरणार नाही. विनोद कांबळीने 18 जानेवारीलाच वाढदिवशी करिअरमधील पहिलं शतक झळकावलं होतं.
त्यावर्षी कांबळीचा 21 वा वाढदिवस होता. जयपूरमध्ये इंग्लंड विरुद्ध तो शतकीय इनिंग खेळला होता. 18 जानेवारी 1993 रोजी विनोद कांबळी ही धमाकेदार इनिंग खेळला होता.
आपल्या वाढदिवशी विनोद कांबळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला होता. टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. नवज्योतसिंह सिद्धू दुसऱ्याच चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर कांबळीने
विकेटवर येऊन टीम इंडियाचा डाव सावरला. जयपूरची विकेट फलंदाजीसाठी कठीण होती. म्हणून कांबळीने क्रीजवर पाय रोवून फलंदाजी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/rinku-singh-famous-cricketer-rinku-singh-to-get-married-to-female-cricketer/

