ग्रामपंचायत अधिकारी मूर्तिजापूरमध्ये असहकार आंदोलनावर

ग्रामपंचायत

मूर्तिजापूर प्रतिनिधी: ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती मूर्तिजापूर यांनी 10 नोव्हेंबर 2025 पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
कारण – तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर सोपवली. ग्रामपंचायत अधिकारी हे कार्य करण्यास तयार असले तरी, त्यांच्याकडे जमिनीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे चुकीच्या लाभार्थ्याला अनुदान जाण्याची शक्यता आहे.

यामुळे केंद्र व राज्याच्या दैनंदिन योजना, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व वसुलीचे काम ठप्प झाले असून अधिकारी बंधूंना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या कामामुळे प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
असहकार आंदोलनाच्या माध्यमातून, अधिकारी संघटनेने (डीएनई 136, तालुका शाखा मूर्तिजापूर) गावनिहाय मदत काम तात्काळ हटवण्याची व संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.

Related News

असहकार आंदोलनाचे निवेदन गटविकास अधिकारी मूर्तिजापूर यांना देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष देवानंद डोंगरे, सचिव सुनील मानकर, उपाध्यक्ष गोवर्धन जाधव, कार्याध्यक्ष अमित कुमार कुरुमकर, महिला उपाध्यक्ष जोशना उमाळे, राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी करुणा वानखडे व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/a-r-rahman-controversy-2024-a-r-rahmans-netizen-santap-said-the-entire-film-industry-is-scared/

Related News