हातरुण: शिक्षक दिनाचे औचित्य साधून जमात-ए-इस्लामी हिंद, शाखा हातरुण यांच्या वतीने इकरा इंग्लिश स्कूल येथे शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात हातरुण परिसरातील अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला.मुख्य मार्गदर्शक मोहम्मद शकील इंजिनियर यांनी आधुनिक व वैज्ञानिक शिक्षण, विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन, इंटरॅक्टिव्ह लर्निंग आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शारीरिक शिक्षा किंवा भेदभावामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढासळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.माजी शिक्षक व लेखक इब्राहिम खान यांनी नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. इकरा इंग्लिश स्कूलचे संचालक मोहम्मद वसीम सर आणि जमात-ए-इस्लामी हिंद शाखा हातरुणचे अध्यक्ष सैयद आबिद यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले आणि नैतिक मूल्यांवर आधारित बदल घडवण्याचे महत्त्व सांगितले.कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना आधुनिक, वैज्ञानिक व नैतिक पद्धती आत्मसात करून विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन करणे होता.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/chani-gavat-environment-sri-shetkari-raja-groupcha-special-message/