विद्यांचल द स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा

विद्यांचल द स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा

अकोट

दि.२२ फेब्रुवरी,२०२५ रोजी विद्यांचल द स्कूल, अकोट येथे पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा

पदवी प्रदान समारंभ म्हणजेच ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणेच, उत्कृष्ट नियोजन

कौशल्य आणि व्यवस्थापन यांच्या सहाय्याने विद्यांचल द स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा संस्मरणीय सोहळा आयोजित केला होता.

Related News

प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर जुनघरे -ठाणेदार अकोट ग्रामीण पोलिस, पालक-शिक्षक संघाचे प्रतींनिधी श्री पुंडलिक

जायले,श्री नंदकिशोर उबाळे , सौ दर्शिका सेजपाल, श्री. लक्ष्मीनारायण भुतडा फाऊंडेशन फॉर एज्युकेशनचे

अध्यक्ष श्री. नरेश भुतडा, विद्यांचल द स्कूलचे संचालक श्री. दिनेश भुतडा, सचिव

सौ.सारिका भुतडा,बोर्ड मेंबर श्री संदीप बूब आणि श्री राजेश भुतडा तसेच प्रशासकीय व्यवस्थापक श्री.प्रशांत विनायक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने

मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.कु.स्वराली धांडे व कु श्यामल भावे यांनी स्वागतपर भाषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर केजीचे विद्यार्थी शिवांश मठपती,ओवी राऊत,जाई सातपुते आणि आरुष नेमाडे यांनी केले.

त्यानंतर सिनियर केजीचा विद्यार्थी शिवांश गाडेकर याने पूर्व प्राथमिक शिक्षणाचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला.तसेच ज्युनियर केजी

आणि सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी श्री.अभिजीत वंडाळे,श्री.धीरज अढाऊ,श्री.गौरव सुरत्ने आणि कु l.श्रद्धा वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली

गीत प्रस्तुती आणि श्री विनायक दाते,श्री.आशिष पांडागडे श्री.रोहित नलोडे व सौ प्रियदर्शनी दास यांच्या मार्गदर्शनाखाली

सामूहिक नृत्य सादरीकरण केले.त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाच्या मेंटर सौ.धनश्री बन्ने यांनी संपूर्ण वर्षाचा आढावा सादर केला

व प्रमुख पाहुणे श्री.किशोर जुनघरे यांनी मोबाईलचा अति वापर वर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सिनियर केजीचे विद्यार्थी रेड

कार्पेटवरून फुलांचा वर्षाव करत स्टेजवर पोहोचले.मंचावर त्यांना मान्यवरांच्या हस्ते डिप्लोमा प्रमाणपत्र आणि विशेष टॅग

लाइन प्रदान करण्यात आली.आभार प्रदर्शन सौ तृप्ती शनवारे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सौ धनश्री बन्ने आणि सौ पायल उज्जनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कु स्वराली धांडे व कु श्यामल

भावे यांनी यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यांचल द स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Read more news here : https://ajinkyabharat.com/maharashthal-bazaar-samityanasathi-pune-yehe-modern-administration-training/

 

Related News