वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान

वीर भगतसिंग

कुरणखेड – २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मोटर वाहन विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याद्वारे पथकाला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला रवींद्र भुयार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर मोहम्मद याकूब, तसेच मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. पथकाने रस्ता सुरक्षा अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती केली असून, अपघात ग्रस्तांना तत्परतेने मदत पोहोचवली आहे. यासाठी त्यांचे कौतुक करत सर्व टीमला प्रशस्तीपत्रकाने गौरविण्यात आले.

सन्मानित पथकात प्रमुख योगेश विजयकर, विजय माल्टे, शहबाज शाह, सैय्यद माजिद, शुभम कातखेडे, मोहन वाघमारे, शेख नजीर, उमेश माल्टे, अक्षय मोरे, हर्षल देवरनकर, शेख मोईन, दिनेश श्रीनाथ, शेख वसीम, गणेश धानोरकर, प्रथम बरडे यांचा समावेश होता.

Related News

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हा सन्मान स्थानिक नागरिकांना रस्ता सुरक्षितता नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला. पथकाच्या धैर्यपूर्ण कार्यामुळे समाजात जनजागृती वाढली असून, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत पोहोचवण्याचे आदर्श पथक म्हणून त्यांचे उदाहरण दिले जाते.

हा सन्मान सोहळा कुरणखेड परिसरात सुरक्षिततेबाबत जनजागृती आणि आपत्कालीन सेवा कार्याची महत्ता अधोरेखित करणारा ठरला.

read also:  https://ajinkyabharat.com/murtijapur-police-takes-major-action-against-motorcycle-theft-thieves-stuck-in-both-states/

Related News