घराच्या सजावटीसोबतच सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अनेक जण घरात विविध झाडं-झुडपं लावतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार कोणती झाडं घरात लावावीत आणि कोणती टाळावीत याबाबत काही खास नियम आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लिंबाचं रोप घरात लावणं शुभ की अशुभ ? चला जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती.
घरात लिंबाचं रोप लावणं – शुभ की अशुभ?
वास्तूशास्त्रानुसार लिंबाचं झाड पूर्णपणे निषिद्ध नाही, मात्र ते घराच्या मुख्य दाराजवळ किंवा घराच्या आतल्या खोल्यांत लावू नये. यामुळे घरात तणाव वाढण्याची शक्यता असते.
खिडकीजवळ, बाल्कनीत किंवा गार्डनच्या परिसरात लिंबाचं रोप लावणं शुभ मानलं जातं. लिंबाच्या झाडाला काटे असतात, त्यामुळे ते नकारात्मक ऊर्जा थांबवण्यास मदत करतं असे मानले जाते.
घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण टिकवण्यासाठी हे रोप उपयुक्त मानलं जातं.
लिंबाच्या रोपासाठी योग्य दिशा कोणती?
वास्तूशास्त्रानुसार काही दिशा या रोपासाठी विशेष शुभ मानल्या जातात:
Related News
ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशा – या दिशेला लिंबाचं रोप लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
दक्षिण-पूर्व दिशा – विशेषतः बाग किंवा अंगणात ही दिशा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनुकूल मानली जाते.
बाल्कनी किंवा छत – जिथे पुरेसं ऊन आणि हवा मिळते अशा ठिकाणी लिंबाचं रोप जोमदार वाढतं.
व्यवसायात प्रगती आणि नफ्यासाठीही दक्षिण-पूर्व दिशेला लिंबाचं झाड लावण्याचा सल्ला दिला जातो.
लिंबाच्या रोपाचा ग्रहांशी असलेला संबंध
वास्तुशास्त्र व ज्योतिषानुसार लिंबाच्या रोपाचा काही ग्रहांवरील नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी वापर केला जातो.शनि दोष कमी करण्यासाठी घरात लिंबाचं रोप लावणं शुभ मानलं जातं.राहू आणि केतूचा प्रभाव कमी होण्यासाठीही लिंबाचं रोप उपयुक्त ठरू शकतं.ग्रहदोष असल्यास लिंबाच्या झाडाला जल अर्पण करणं हितकारक मानलं जातं.नजर दोषापासून बचावासाठी मुख्य दरवाजाजवळ शनिवारी लिंबू-मिरची लावण्याची परंपरा आहे.
टीप
वरील माहिती वास्तू व धार्मिक मान्यतांवर आधारित असून, याची कोणतीही वैज्ञानिक खात्री नाही. ही माहिती केवळ जनजागृती व सामान्य ज्ञानासाठी दिली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/baramati-state-level-karate-competition-akolacha-danka/
