पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा
भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांचा जल्लोष
नागपूर–पुणे वंदेभारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
या वेगवान रेल्वे सेवेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला..विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला
थेट जोडणारी ही गाडी सुरू झाल्यामुळे, विशेषतः विदर्भातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय होणार आहे.
देशात सर्वात लांब पल्ल्याची ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी आहेय , मात्र आज ठिकठिकाणी गाडीचे
स्वागत असल्याने पहिल्याच दिवशी ही रेल्वे सुमारे एक तास उशिराने धावत आहे..
अकोला लोकसभा भाजपाचे खासदार अनुप धोत्रे , तसेच भाजपा आमदार रणधीर
सावरकर यांच्या वतीने वंदेभारत एक्सप्रेसचे अकोला रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले.
Read also https://ajinkyabharat.com/government-of-pakistan-human-rights-commission-intense-sorrow/: