‘वाळन’ कथासंग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट

वाळन

पातुर तालुक्यातील खेट्री येथील साहित्यिक प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांचे साहित्यिक कार्य महाराष्ट्रात आणि विदर्भात विशेष मान्यतेस पात्र ठरले आहे. त्यांच्या प्रसिद्ध कथासंग्रह वाळन ला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे, हा कथासंग्रह आता बी. ए. भाग-२ (सत्र ४) च्या मराठी साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन राघव पब्लिकेशन द्वारे ‘वैदर्भीय कथा’ या संकलनात झाला असून, संपादक म्हणून डॉ. गणेश मालटे, डॉ. गजानन मुंदे आणि डॉ. राजेश मिरगे यांनी काम केले आहे. याशिवाय, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. माधव पुटवाड यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहून त्याची महत्त्वपूर्णता अधोरेखित केली आहे.

‘वाळन’ कथासंग्रह ग्रामीण जीवनातील वास्तव, मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म भावविश्व, सामाजिक जाणिवा आणि जीवनातील विविध वळणांचे संवेदनशील चित्रण करून वाचक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतो. प्रवीण बोपुलकर हे प्रशासकीय सेवेत कार्यरत असूनही सातत्याने साहित्य साधनेत सक्रिय आहेत. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘अवतरण चिन्ह’ या कविता संग्रहासह ‘वाळन’ या कथासंग्रहाचा समावेश आहे.

सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल या संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये साहित्यिक उपक्रम राबविले आहेत. तसेच, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी व गझलकार म्हणून सहभाग नोंदवत त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले आहेत.

Related News

संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘वाळन’चा समावेश हा त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या कथासंग्रहामध्ये ज्येष्ठ कथाकार उद्धव शेळके, भाऊ मांडवकर, नामदेव कांबळे, बाबाराव मुसळे, प्रतिमा इंगोले, पुरुषोत्तम बोरकर, सतीश तराळ, सदानंद देशमुख, अशोक मानकर, एकनाथ तट्टे यांसारख्या मातब्बर साहित्यिकांसोबत प्रवीण बोपुलकर यांचे स्थान मिळाल्याने, साहित्यप्रेमींमध्ये आनंद आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/marathi-language-pride-day-celebrated-with-enthusiasm-at-st-pauls-academy-akot/

Related News