वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने नाथ समाजासाठी आर्थिक विकास
महामंडळाच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे आंदोलन, तसेच शेकडो निवेदने
राज्य शासनाला पाठविल्यानंतर सुध्दा यांची दखल राज्य सरकारने
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
न घेतल्यामुळे अखेर वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने राज्यपालांकडे
इच्छा मरणाची परवानगी पदाधिकाऱ्यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
दिलेल्या निवेदनात मागितली आहे. निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की,
लिंगायत, गुरव, वडार, रामोशी,सुतार, न्हावी, खाटिक, राजपुत, बारी, ब्राम्हण,
विणकर तसेच तेली या समाजाकरीता शासनाने स्वतंत्र आर्थिक
विकास महामंडळे निर्माण केलीत. विशेष म्हणजेच यातील बऱ्याच समाजांनी
कुठल्याही प्रकारची मागणी राज्य शासनाकडे केली सुध्दा नव्हती.
परंतु राज्यातील अतिशय मागास स्थितीमध्ये असलेला नाथसमाज मात्र
कायम दुर्लक्षित राहिला आहे. वैदर्भिय नाथ समाज संघाच्या माध्यमातुन
मच्छिंद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी आजतागायत
विविध प्रकारची आंदोलने, मोर्चे, धरणे आंदोलनेव राज्यभऱ्यातुन शेकडो
निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे देऊनही
स्वत:ला नाथ भक्त म्हणून आपल्या नेत्यांवर फक्त सिनेमे काढणाऱ्यांना
अजुनही जाग येत नसल्यामुळे या नाथसमाज द्वेशी राज्य सरकारच्या
दुजेभावाला कंटाळून वैदर्भिय नाथ समाज संघाच्या पदाधिकार्यांनी
इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/raj-thackeray-active-varalit-anekancha-mnset-entry/