‘वडील जिवंत असताना मुलं….’, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर CM फडणवीस स्पष्टच बोलले, ‘मुघली संस्कृती…’

'वडील जिवंत असताना मुलं....', संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यावर CM फडणवीस स्पष्टच बोलले, 'मुघली संस्कृती...'

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) वारसदार होणार का अशी चर्चा रंगली आहे.

भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो

Related News

असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.

“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते.

बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात.

संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,”

असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

“नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत.

अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे.

आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत.

त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”.

पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो.

ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात.

सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”.

राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका

दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं.

राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं.

मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर

असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.

राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे

तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो,

कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे.

म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे.

पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.

Related News