वादळी वाऱ्यासह गारपिटीने कांदा, गहू, ज्वारीचे प्रचंड नुकसान; शेतकरी अडचणीत

वादळी वाऱ्यासह गारपिटीने कांदा, गहू, ज्वारीचे प्रचंड नुकसान; शेतकरी अडचणीत

निंबा अंदुरा (ता. अकोला): दिनांक 2 एप्रिलच्या मध्यरात्री 11 वाजता काझी खेळ,

जानोरी मेळ, वझेगाव, मोखा, हिंगणा परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा,

Related News

गहू आणि ज्वारी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरणी केलेली असल्याने त्यांचे नुकसान अधिकच गंभीर झाले आहे.

शेतकऱ्यांनी या नुकसानीबाबत शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी,

अशी मागणी केली आहे. काझी खेळ येथील शेतकरी अनिल शिवराम धुमाळे यांच्या शेतातील

कांदा वादळी पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.

तसेच जानोरी मेळ येथील रमेश परघर मोर, धर्मानंद परघर मोर, दामोदर मस्के, गोपाल खोटरे,

अनंता खोटरे, सचिन काळे, सुधाकर काळे, धनराज खोटरे, गजानन काळे, शांताराम काळे

आदी शेतकऱ्यांचे कांदा आणि ज्वारी पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

शेतकऱ्यांनी शासनावर नाराजी व्यक्त करत, नुकसानीचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने वेळेत मदत न केल्यास शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल

आणि त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील,

अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Related News