अज्ञात वाहनाची वृद्ध महिलेस जोरदार धडक!

अज्ञात वाहनाची वृद्ध महिलेस जोरदार धडक!

अपघात स्थळावरून वाहन पसार

महिलेची प्रकृती चिंताजनक

अकोट : 22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वा. दरम्यान एक महिला उपविभागीय पोलीस

Related News

अधिकारी यांचे कार्यालय जवळून पायी जात असताना, मागील बाजूने भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाने सदर महिलेस जबर धडक दिली.

झालेल्या या अपघातामध्ये महिला वीस ते पंचवीस फुटापर्यंत फेकल्या गेली.

यामध्ये महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली. महिलेला उपचारार्थ अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते.

महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.

सदर महिला मंगला अशोक पाटील वय अंदाजे 65 वर्ष राहणार कोल्हापूर स्थित रहिवासी असल्याचे समजते,

त्यांची मुलगी अकोट नगरपालिकेमध्ये नोकरीवर असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या.

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

अकोट शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य रस्त्याने लावले जाणार आहेत.

शहरामध्ये अपघाताला आळा घालण्यासाठी तिसऱ्या डोळ्याची अत्यंत गरज आहे.

एखादं वाहन अपघात करून भर वेगाने निघून जाते, जीवाची कुठलीही परवा न करता,

त्याला वाचविण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.

अकोट शहर पोलिसांच्या वतीने शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम तात्काळ पूर्ण करून,

सेवेत सुरू करण्याची मागणी या निमित्ताने शहरातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/chhawasathi-rashmika-navhe-is-the-actress-of-the-first-person/

Related News