विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत
प्रमुख लढत होणार आहे. परंतु राज ठाकरे यांचा मनसे पक्षही
महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी
Related News
Taskaree: The Smuggler’s Web – Emraan Hashmi ची दमदार सुरुवात, पण कथानकातील वळणांनी उत्सुकता कमी करणारी मालिका
नेटफ्लिक्सवरील Taskaree: The Smuggler’s Web ही मालिका सुरूवातीपासूनच...
Continue reading
एकेकाळी मोफत, आता भारतातील सर्वाधिक मागणी असलेली भाज्या – २०२५ मध्ये Coriander मारली बाजी
एका काळी आपल्या स्वयंपाकात मोफत मिळणारी साधी हिरवी पानभाजी,
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
Nupur Sanon Reveals : कृती सानोने माझ्या आईसमोर माझे प्रेम मान्य करून दिले
बॉलिवूडमध्ये बहिणींच्या नात्याचे महत्व नेहमीच विशेष असते. नुकतेच अभिनेत्री
Continue reading
Winter मधे ऊर्जा आणि तृप्तीसाठी ७ प्रोटीनयुक्त लाडू: आरोग्यदायी गोड चव जी ठेवते तुम्हाला तंदुरुस्त
Winter म्हटलं की शरीराला अधिक ऊर्जेची, उष्णतेची आणि...
Continue reading
Gold and Silver Prices : 100 वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचा प्रवास
शेअर बाजारातील घसरणी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे Gold and Silver च्या किमत...
Continue reading
Bath with Saltwater : त्वचेसाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bath with Saltwater : आजकाल स्किनकेअरच्या जगात दररोज नवी...
Continue reading
Sanjay Kapoor च्या 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कॉल डिटेल रेकॉर्ड्समुळे उघडला धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन
Continue reading
महाराष्ट्रापेक्षा लहान देश India साठी देवदूत बनला; रशियन तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी इक्वेडोरकडून तेल खरेदी
महाराष्ट्रापेक्षा लहान देश India साठी देव...
Continue reading
Make Traditional Rajasthani Besan Methi Paratha at Home – कुरकुरीत बाहेर, मऊ आत
Rajasthani Besan Methi Paratha : राजस्थानी पद...
Continue reading
Assam: India's 'Tea Capital' : जिथे चहा फक्त पेय नाही, संस्कृती आहे
Assam: India's 'Tea Capital' : चहा हा फक्त भारतातल्या लोकां...
Continue reading
महायुतीला पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभा निवडणूक स्वबळावर
लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. त्यांनी मनसेच्या काही
उमेदवारांची घोषणासुद्धा केली आहे. तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित
ठाकरे या निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरणार असल्याची
शक्यता आहे. यामुळे महायुतीकडून राज ठाकरे यांचे मन वळण्याचा
प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ राज
ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. आता या भेटीत
काय ठरणार? त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का?
हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि
मुरलीधर मोहळ यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेचे पुण्यातील
10 नेते ही शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. त्यात मनसेचे दोन शहरप्रमुख,
6 राज्य सरचिटणीस, 2 प्रवक्ते यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील 13
आणि शहरातील 8 अशा 21 विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे
आढावा घेणार असल्याचे माहिती आहे. मुरलीधर मोहळ यांच्या राज ठाकरे
यांच्याशी होणाऱ्या भेटीनंतर पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची
शक्यता आहे. पुणे शहर किंवा जिल्ह्यातील काही जागांवर राज ठाकरे महायुतीला
पाठिंबा देतात का? भाजप मनसेला काही जागा देणार का? या सर्व गोष्टींवर
या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर
मोहळ आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे परिणाम आता विधानसभा निवडणुकीत
उमटणार आहे. राज ठाकरे यांचे लक्ष्य महाविकास आघाडी आणि उबाठा
शिवसेना आहे. त्यामुळे त्यांना फायदा होईल, असे पाऊल उचलले जाऊ नये,
अशी भूमिका मुरलीधर मोहळ मांडण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/important-meeting-of-manoj-jarange-today/