दुर्गवाडा फिटर अंतर्गत लाखपुरीसह इतर गावे अंधारात; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

दुर्गवाडा फिटर अंतर्गत लाखपुरीसह इतर गावे अंधारात; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

वृत्तसेवा – अतुल नवघरे

लाखपुरी (ता. १० एप्रिल) : मुर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या लाखपुरीसह इतर गावांमध्ये

सतत लाईन चालू-बंद होत असल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.

Related News

दिवस आणि रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या विजेच्या अडचणीमुळे फ्रिज, टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे यासारख्या विद्युत उपकरणांचे नुकसान

होण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

नागरिकांचे म्हणणे –

  • “लाखपुरी सह इतर गावांमध्ये लाईन बंद राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने याकडे लक्ष द्यावे.”
    सौ. मीनल नवघरे (माजी पं.स. सदस्या, लाखपुरी)

  • “सतत लाईन जात असल्यामुळे घरातील उपकरणांची हानी होऊ शकते. महावितरण विभागाने त्वरीत पावले उचलावीत.”
    अॅड. दत्तराज देशमुख (लाखपुरी)

  • “या समस्येमुळे गावातील जनतेला नाहक त्रास होत आहे. तीव्र निषेध करतो.”
    पुरुषोत्तम डागा (लाखपुरी)

महावितरणचे स्पष्टीकरण –

याबाबत ज्युनिअर इंजिनिअर अनिकेत भोंदाणे म्हणाले की, “हवामानाच्या बदलामुळे कधी कधी ट्रिपिंग होते.

मात्र आठ दिवसांत ही समस्या सोडवली जाईल.”

नागरिकांची मागणी आहे की दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील लाईन

समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा व महावितरण विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावे.

Related News