उमरा येथे पारंपारिक द्वारका उत्सव उत्साहात साजरा
अकोट – अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या उमरा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपारिक द्वारका
उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. तब्बल तीनशे वर्षांची अखंड परंपरा असलेला हा सोहळा वाकाजी महाराज मंदिराशी
जोडलेला आहे.शेतकऱ्यांसोबत वर्षभर आपल्या शेतात काम करणाऱ्या बैल (मूषक राजा) यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा
उत्सव आहे. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना अतिरिक्त दोन चाके जोडून आकर्षक फुले व साड्या याने सजवतात, ज्याला
स्थानिक भाषेत ‘मखर’ असे म्हणतात. सजवलेले बैल वाकाजी महाराज मंदिरात आणले जातात आणि त्यांना मंदिरात चढवून समाधीचे दर्शन घडवले जाते.
त्यानंतर ढोल-ताशांच्या आवाजात गावातून भव्य मिरवणूक काढली जाते. परंपरेमागे अशी आख्यायिका आहे की, ३ ते ३.५
शतकांपूर्वी गावात बैलांवर रोगराई पसरली होती. काही शेतकऱ्यांनी नवस केला की रोग नाहीसा झाला तर मूषक राजाला
मकरामध्ये चढवून गावात मिरवणूक काढली जाईल. अशा प्रकारे ही परंपरा पुढे सुरू राहिली.
गावातील उमरा सर्कलचे भाजप कार्यकर्ते रामदादा मंगळे यांनी मकराच्या मालकांना सन्मान चिन्ह देऊन उत्साह वाढवला. तसेच
अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जूनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Read also : https://ajinkyabharat.com/congress-aamdar-online-betting-case-caught/