उमरा येथे बांधकाम कामगारांसाठी ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू

उमरा येथे बांधकाम कामगारांसाठी ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू

उमरा (ता. अकोट, जि. अकोला) | प्रतिनिधी – रामेश्वर कावरे, अजिंक्य भारत

उमरा गावात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ८ दिवसांचे

प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश बांधकाम कामगारांचे कौशल्यविकास करणे,

Related News

त्यांना अधिक रोजगाराच्या संधी मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा आहे.

या शिबिरात कौशल्य विकास, सुरक्षा आणि आरोग्य विषयक प्रशिक्षण,

तसेच कामगार कल्याण योजनांची माहिती दिली जात आहे.

गावपातळीवरच हे प्रशिक्षण दिल्यामुळे स्थानिक कामगारांना सहज सहभागी होता येत असून, त्यांना याचा मोठा फायदा होत आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शैक्षणिक,

आरोग्यविषयक, आर्थिक व निवृत्तीसंबंधी योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे अधिकाधिक बांधकाम

कामगारांनी नोंदणी करून मंडळाच्या योजना आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/thar-gadichya-topower-dance/

Related News