उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,

उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,

प्रतिनिधी: रामेश्वर कावरे | उमरा, अकोट तालुका

अकोट तालुक्यातील उमरा गावाच्या सीमेवर असलेल्या ११ केव्ही कासोद फिडरवरील रोहित्राजवळ,

एका मेंढीपाळकावर भीषण प्रसंग ओढावला. दि. १२ एप्रिल रोजी, गणेश मोरे हे आपल्या बकऱ्यांना नदीकाठी चारत असताना

Related News

त्यातील एक बकरी रोहित्राजवळ चाऱ्याच्या शोधात गेली.

रोहित्राच्या आवारात असलेल्या विद्युत केबलला ती चिटकली आणि तीथेच तिचा मृत्यू झाला.

बकरीला वाचवताना स्वतःचा जीव पणाला

गणेश मोरे यांनी बकरीला वाचवण्यासाठी तिला खेचण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही लघुदाब वाहिनीचा जोरदार विजेचा धक्का बसला.

सुदैवाने त्यांचा जीव वाचला, मात्र त्यांच्यासमोरच २०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

रोहित्रावर वेलींचे साम्राज्य, अधिकारी दुर्लक्षी

हा रोहित्र गावाच्या मुख्य रस्त्यालाच लागून असूनही, उमरा उपकेंद्रातील

अभियंता व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित्रावर वेलींचे साम्राज्य इतके वाढले आहे की,

त्यातून अनेक वेळा लाईनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

मात्र, लाईनमनही अनेकदा फोन उचलत नाहीत किंवा टाळाटाळ करतात, असा आरोप नागरिकांनी केला.

“आम्हीच डिओ टाकतो, आमच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?”

संतप्त नागरिकांनी सांगितले की, लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यावर रात्रीच्या वेळी ग्रामस्थच स्वतः डिओ टाकतात,

कारण कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. “आमच्या जीवाला काही झालं तर जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/mushlutun-fire-fire-shetkari-aani-divyanganchaya-hakkasathi-prahar/

Related News