मुर्तिजापूर : उमई गावात रविवारी सकाळी जुना वाद भडकला आणि दिपक अवधूत वानखडे यांचा खून करण्यात आला, तर त्यांच्या नातेवाईकाला गंभीर जखमा झाल्या. ही घटना २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, आरोपी गजानन विश्वास मानकर (वय ३८, रा. उमई) यांनी दिपक वानखडे यांच्यावर पोटात विळा मारून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत मृतकाचा नातेवाईक श्रीराम पांडोजी वानखडे यांनाही हात व पोटावर लोखंडी विळा आणि काठीने गंभीर इजा झाली.मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथे प्रेतविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर गंभीर जखमी श्रीराम वानखडे यांना त्वरित १०८ ॲम्बुलन्सने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेनंतर आरोपी गजानन विश्वास मानकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे व हवालदार-कॉन्स्टेबल यांच्यासह पोलीस पथकाने तत्परतेने कारवाई केली. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सध्या गावात शांतता प्रस्थापित असून पोलीस प्रशासन सतर्क आहे.
read also : https://ajinkyabharat.com/arbitrary-lifestyle-direction/