‘नीट’ परीक्षेवरून घमासान सुरू असतानाच 19 जून रोजी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा रद्द केली.
Related News
नेट परीक्षा रद्द करण्याच्या कारणाचाही खुलासा करण्यात आला असून,
आता शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी
सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षा एजन्सी एनटीएद्वारे 18 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती.
मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’वरून गोंधळ सुरू असतानाच
आणखी एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली.
‘एनटीए’कडून 18 जून रोजी यूजीसी नेट परीक्षा घेतली होती.
11 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
एका दिवसानंतरच परीक्षा रद्द करण्यात आली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. “19 जून 2024 रोजी
विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC)
केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटरच्या
सायबर क्राइम शाखेकडून या परीक्षेबद्दल काही माहिती मिळाली होती.
त्या माहितीतून प्राथमिक अंदाजानुसार संकेत मिळाले की,
या परीक्षेत गडबड करण्यात आली आहे.”
शिक्षण मंत्रालयाने पुढे असेही म्हटले आहे की,
“या परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि पवित्रता सुनिश्चित करण्यासाठी
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की,
यूजीसी नेट जून 2024 परीक्षा रद्द करण्यात यावी.”
नव्याने परीक्षा घेतली जाईल. त्यासंदर्भातील माहिती दिली जाईल.
त्याचबरोबर याचा तपास करण्यासाठी हे प्रकरण
सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे”, असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pandhya-ration-card-holders-will-get-free-treatment-up-to-rs-5-lakh/