नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची
घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत
असताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20)
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आणि सैफत शित (वय 21) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने
देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल
करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित
केले. आयएफजी फील्ड गणचा तुकडा शरीरात घुसल्याने त्यांचा
मृत्यू झाला. नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद
करण्यात आली आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय
लष्कारातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशात अग्नीवीर
योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांचे प्रशिक्षण
नाशिकमधील देवळाली भागात होते. या प्रशिक्षणा दरम्यान दोन
अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले
जात होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये गोहिल
सिंग आणि सैफत शित गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने
रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या
प्रकरणामुळे खळबळ उडली आहे. आता पोलीस आणि
लष्कराकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नीवीर जवानांची तुकडी
नाशिकमधील शिंगवे बहुलाला फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी गेली
होती. यावेळी तोफेजवळ गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे बॉम्बचे
शेल उडून त्या अग्नीवीर जवानांच्या शरीरात गेले. या घटनेत दोघ
जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक अग्निवीर जखमी झाला आहे.
त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/mns-president-raj-thackerays-letter-to-narendra-modi/