ट्रम्प यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ, भारतासाठी धोक्याची घंटा

ट्रम्प

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या सनसनाटी खुलाशानं आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की पाकिस्तान, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया हे देश गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेनंही तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा अण्वस्त्र चाचण्या सुरू केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांनी सीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की,

“रशिया आणि चीन अण्वस्त्र चाचण्या करत आहेत, पण ते उघडपणे यावर बोलत नाहीत. पाकिस्तानदेखील भूमीगत अण्वस्त्र चाचण्या करत आहे, त्यामुळे त्यांचा शोध घेणं अवघड आहे.”

Related News

या दाव्यानंतर भारतातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण भारताचे दोन्ही शेजारी — चीन आणि पाकिस्तान — जर अण्वस्त्र चाचण्या करत असतील, तर भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम होऊ शकतो.

ट्रम्प यांनी या मुलाखतीत आणखी एक धक्कादायक खुलासा करताना सांगितलं की,

“मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अण्वस्त्र संघर्षापर्यंत पोहोचला होता. मात्र, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे ते युद्ध टळलं. मी दोन्ही देशांना इशारा दिला की जर युद्ध झालं तर अमेरिका कोणताही व्यापार करणार नाही.”

भारतानं शेवटची अण्वस्त्र चाचणी १९९८ मध्ये पोखरणमध्ये केली होती. त्यानंतर भारताने स्वयंघोषित “नो टेस्ट पॉलिसी” स्वीकारली आहे. पण आता ट्रम्प यांच्या या दाव्यांमुळे भारतासमोर “पोखरण-३” ची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.

तज्ञांच्या मते, जर पाकिस्तान आणि चीन गुप्त अण्वस्त्र चाचण्या करत असतील, तर भारतालाही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोरणात्मक पुनर्विचार करावा लागेल.

महत्त्वाचे मुद्दे :

  • ट्रम्प यांचा दावा — पाकिस्तान, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत आहेत.

  • अमेरिका ३३ वर्षांनंतर पुन्हा अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा खुलासा.

  • भारतासाठी चिंतेची बाब — दोन्ही शेजारी देश अण्वस्त्र क्षमतेत वाढ करत असल्याचा संशय.

  • भारताकडून १९९८ नंतर एकही अण्वस्त्र चाचणी नाही.

  • “पोखरण-३” चर्चेत.

read also : https://ajinkyabharat.com/photographs-of-the-bloody-massacre-in-sudan-at-the-end-of-december/

Related News