Donald Trump Pharma Tariffs: युद्धाच्या सावटात अमेरिकेत ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर 100% टॅरिफचा प्रस्ताव, भारतीय कंपन्यांचे शेअर्स कोसळले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा जागतिक औषध बाजारात तुफान घालवायला सज्ज आहेत. युद्धाच्या सावटाखाली असताना ट्रम्प प्रशासनाने औषधांवर टॅरिफ वाढवण्याचा विचार सुरू केला आहे, ज्यामुळे भारतीय औषध कंपन्यांसह जागतिक औषध उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून ट्रम्प यांनी औषध उत्पादन कंपन्यांवर जोरदार दबाव टाकला होता. आता त्यांनी ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील औषधांच्या किमती कमी राहण्याची हमी देणाऱ्या करारांवर स्वाक्षरी न केलेल्या कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेत औषधांची कमी किमती देणाऱ्या कंपन्यांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरू शकतो. यामुळे जागतिक औषध कंपन्या आपली उत्पादन क्षमता वाढवून अमेरिकेत साठा करण्यास सुरुवात करत आहेत.
Related News
ट्रम्प यांनी म्हटले होते, “जोपर्यंत औषध उत्पादक स्थानिक पातळीवर उत्पादन सुविधा उभारणार नाहीत, तोपर्यंत ब्रँडेड किंवा पेटंट औषधांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते.” हा प्रस्ताव 1962 च्या Trade Expansion Act च्या कलम 232 अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षाविषयक चौकशीवर आधारित आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही चौकशी सुरू झाली होती आणि आता या चौकशीच्या निष्कर्षानंतर नवीन शुल्क लादले जाऊ शकते.
या टॅरिफमुळे काही कंपन्यांना सूट मिळण्याची शक्यता आहे. फायझर आणि ॲस्ट्राझेनेका या कंपन्यांनी TrumpRx.gov प्लॅटफॉर्मवर वचनबद्धता दर्शवून अनेक वर्षांसाठी शुल्कातून सुट मिळवली आहे. तसेच, एली लिली, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मर्क यांनी अमेरिकेत आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.
भारतीय औषध कंपन्यांवरही या निर्णयाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील बाजार हा भारतीय कंपन्यांसाठी सर्वात मोठा आहे, जिथे Biocon, Glenmark Pharma, Sun Pharma, Aurobindo Pharma, IPCA Labs अशा कंपन्या जेनेरिक औषधांची विक्री करतात. अमेरिकेतील विक्रीतून या कंपन्यांना मोठा महसूल मिळतो, त्यामुळे टॅरिफ लागू झाल्यास भारतासह जागतिक औषध उद्योगावर मोठा आर्थिक झटका लागू शकतो.
टॅरिफच्या भीतीमुळे भारतीय औषध कंपन्यांचे शेअर बाजारात मोठे घसरण झाली आहे. निफ्टी फार्मा निर्देशांकमध्ये Biocon टॉप लुजर ठरली आणि तिचा शेअर 5% पेक्षा अधिक घसरला. त्याचबरोबर, Glenmark Pharma, Aurobindo Pharma, Sun Pharma आणि IPCA Labs या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली.ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे फक्त औषध कंपन्यांनाच नव्हे, तर रुग्णांनाही प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत औषधांच्या किमती वाढल्यास जेनरिक औषधांची उपलब्धता कमी होईल आणि लोकांना औषधं महागात मिळण्याची शक्यता आहे.
जागतिक औषध कंपन्यांनी टॅरिफच्या धोके लक्षात घेऊन आपल्या धोरणांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, अमेरिकेत साठा करणे, स्थानिक उत्पादन केंद्र उभारणे आणि दीर्घकालीन करारांसाठी तयारी करणे या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, आगामी काळात जागतिक औषध व्यापारात मोठे बदल घडू शकतात.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे केवळ औषध कंपन्यांवर आर्थिक दबाव पडणार नाही, तर जागतिक औषध धोरणांवरही परिणाम होईल. भारतातील औषध कंपन्यांना आता आपल्या उत्पादन आणि निर्यात धोरणांमध्ये तत्काळ बदल करण्याची गरज आहे, अन्यथा अमेरिकेतील बाजारपेठेत त्यांचा हिस्सा कमी होण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे ट्रम्प पुन्हा एकदा जगाला टॅरिफचा कडू डोस देण्यास तयार आहेत, आणि युद्धाच्या सावटाखाली हा धोरणात्मक निर्णय जागतिक औषध उद्योगासाठी मोठा आव्हान ठरू शकतो.
