वंचित, राष्ट्रवादी, भाजप आमने-सामने
मुर्तीजापुर मतदार संघात भारतीय जनता पार्टी, वंचित
बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी लढत
Related News
होण्याचे संकेत आहे. यंदा तिन्ही पक्षांमध्ये काट्याची
टक्कर होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
वंचित बहुजन आघाडीने यंदा डॉक्टर सुगत वाघमारे यांना
उमेदवारी बहाल केली. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने
सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिली आहे. वृत्त लिहीपर्यंत
भारतीय जनता पार्टीने मुर्तीजापुर मतदार संघात उमेदवार
घोषित केला नव्हता. त्यामुळे नागरिकांना भाजप कोणाला
तिकीट देणार याची उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत
भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. गेल्या
काही वर्षापासून हरीश पिंपळे यांनी मुर्तीजापुर मध्ये भाजपचा गड
राखला. मात्र यंदा त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचे दिसून
आले. त्यातच उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटातून
रवी राठी यांनी भाजपमध्ये उडी मारली आहे. आता भाजपने रवी
राठी यांना उमेदवारी न दिल्यास ते भाजपच्या उमेदवारासाठी काम
करतील का? हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. एकंदरीत कोणत्याही
पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून निवडून येणे वाटते तेवढे
सोपे नाही हे मात्र निश्चित.
Read also: https://ajinkyabharat.com/ravikant-tupkar-will-support-candidates-with-clean-character/
