त्र्यंबकेश्वरमध्ये साधूवेषातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

त्र्यंबकेश्वरमध्ये साधूवेषातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

त्र्यंबकेश्वर (नाशिक) :

श्रद्धास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक साधूवेषातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

झाल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related News

प्रभाकर घोटे असे या मृत व्यक्तीचे नाव असून, तो त्र्यंबकेश्वर परिसरात भटकंती करणारा

असल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओ समोर; मारहाणीचा संशय

या प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज समोर आला असून, त्यामध्ये अज्ञात इसम साधूच्या वेशातील

व्यक्तीला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात आखाडा परिषदेतील महंतांनी गंभीर आरोप करत म्हटलं की,

दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने साधूला मारहाण केली, आणि हा प्रकार

पवित्र त्र्यंबकेश्वरसारख्या क्षेत्राच्या मर्यादा ओलांडणारा आहे.”

प्राथमिक तपासात मारहाणीचे खुणा नाहीत

दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रभाकर घोटे यांच्या शरीरावर कोणत्याही

प्रकारचे मारहाणीचे निशाण नाहीत, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे नेमका मृत्यू

मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दारूबंदीची मागणी जोरात

या घटनेनंतर त्र्यंबकेश्वरमधील साधू-संत आणि आखाडा परिषदेने ठाम भूमिका घेत,

त्र्यंबकेश्वरमध्ये दारूबंदी लागू करण्यात यावी,” अशी मागणी केली आहे. “हजारो भाविक त्र्यंबकेश्वरात दर्शनासाठी येतात,

परंतु अनेकदा त्यांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागते,” असा संतप्त सूरही संतसमाजातून उमटतो आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/beed-crime/

Related News