डोणगाव :- येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद सर्कल निवडणूक होणार आहे पण त्या आधीच डोणगाव जिल्हा परीषद मध्ये निवडणूकीची रंगत वाढली व इच्छुक उमेदवारांविषयी चौकाचौकात गप्पा ऐकायला मिळत आहे. यावर्षी डोणगाव जिल्हा परीषद सर्कल हे सर्वसाधारण गणासाठी सुटले व पंचायत समिती ही सर्वसाधारण साठी सुटले आहेत तर डोणगांव जिल्हा परिषद मध्ये असणारे लोणी गवळी आंध्रृड भोसा ही गावे कमी होऊन त्याऐवजी नविन बेलगाव विठ्ठलवाडी ही गावे समाविष्ट झाली असल्याने परंपरागत असणारी गावे तुटल्याने जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार यांना नवीन गावातील लोकांशी संपर्क साधून मी कसा चांगला हे सांगण्याची कसरत करावी लागत आहे.
डोणगाव जिल्हा परीषद मध्ये कॉग्रेस कडून कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी विनायक टाले वसंतराव देशमुख हे इच्छुक असून यात शैलेश सावजी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी म्हणून अर्ज भरुन घेत मतदारांशी संपर्क साधला असल्याने कॉंग्रेस कडून शैलेश सावजी यांना तिकीट मिळण्याची जास्त संधी असल्याचे मतदारातून बोलले जात आहे .
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या कडून ही शिवसेना तालुकाप्रमुख प्रमुख निंबाजी पांडव हे एकमेव इच्छूक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय आखाडे हे इच्छुक उमेदवार आहेत पण भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे हे इच्छुक उमेदवार असून ते बेलगाव व डोणगाव येथील रहीवासी असल्याने त्यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे.
Related News
सध्या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे कारण माजी क्रृषी सभापती राजेंद्र पळसकर हे सध्या निवडणुकीचा मौसम असताना ही शांत असल्याने शिंदे सेनेची उमेदवारीबाबत डोणगाव जिल्हा परीषद मध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी शिंदे सेनेकडून डॉ.गजानन उल्हामाले हे इच्छुक उमेदवार आहेत .
यावर्षी डोणगाव जिल्हा परीषद च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही रिंगणात ऋषांक चव्हाण यांना उतरवणार असल्याचे चर्चा आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चा ही उमेदवार रिंगणात राहणार असला तरी जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने अनेक असंतुष्ट हे अपक्ष रिंगणात उतरणार आहेत .
मात्र खरी लढत ही शिवसेना व कॉंग्रेस या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार असल्याने शिवसेना व कॉंग्रेसचे इच्छूक सध्या गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेताना दिसत आहेत .
मात्र अद्याप ही जनतेच्या मनात शिंदे गटांच्या शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार यांविषयी संभ्रम असल्याने याचा फायदा ईतर पक्षाचे इच्छूक घेऊन आमची युती होऊन मला तिकीट मिळणार असे सांगीत असले तरी मात्र ऐन वेळेवर नामदार प्रतापराव जाधव हे कोणाच्या गळ्यात माळ टाकून शिंदे सेनेचा उमेदवार करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/amit-baghels-objectionable-statement-banned-in-chhattisgarh/
