‘तो’ अधिकारी ठाकरेंच्या मर्जीतला… ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक, सदावर्ते पुन्हा आक्रमक

‘तो’ अधिकारी ठाकरेंच्या मर्जीतला… ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक, सदावर्ते पुन्हा आक्रमक

‘पीएफचे पैसे कापले जातात, पण ते पीएफ अकाऊंटला जमा होत नाही.

पैसे न देणं ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे’, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते

पुन्हा एकदा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढताना दिसत आहे.

Related News

एसटी महामंडळामधील वाहक, चालक आणि मॅकेनिकल यांचे घामाचे,

कष्टाचे पीएफचे पैसे कापले जातात, परंतू ते पीएफ अकाऊंटला जमा होत नसल्याचा

आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की,

एसटीतील कर्मचाऱ्यांचा कष्टाचे, घामाचे पैसे कापले जातायत पंरतू गेल्या ४ महिन्यांपासून ते पैसे दिले जात नाही.

हे दोन्ही पैसे न देणं हे वेदनादायी असून कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जात आहे,

असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तर गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरे

यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचा हल्लाबोल देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

इतकंच नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांना पैसे न देणं ही चिटिंग आहे, ते दिले जात नाहीत.

ही बाब आम्ही प्रताप सरनाईक यांना त्यांच्या बंगल्यावर भेटलो तेव्हा सांगितली.

पण अधिकाऱ्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

करुन अटक झाली पाहिजे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/kombdyachan-masam-khalyanam-gbs-chief-lagan-ajit-pawanchanta-rajyati-jantela/

Related News