पाकिस्तानात सध्या टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सची पोलिसांकडून
धरपकड सुरु आहे. पंजाब प्रांतातील एका विद्यार्थिनीवरील कथित
बलात्काराच्या अफवा पसरवल्याबद्दल डझनहून अधिक व्लॉगर्स
Related News
Govinda : गोविंदा–सुनीता यांच्या नात्यावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य; नेमकं सुरू तरी काय?
अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा ...
Continue reading
Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Amravati : Amravatiच्या जिल्ह...
Continue reading
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
Tukaram Mundhe Action On Mi...
Continue reading
नितीन गडकरींचं मोठं विधान; ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका ...
Continue reading
20 वर्षांचा लढा जिंकूनही प्रशासनाकडून पिळवणूक; नैराश्यातून पुसद येथील वनमजुराची यवतमाळमध्ये आत्महत्या
यवतमाळ : वनमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी तब्बल 2 ...
Continue reading
भारताकडे मैत्रीचा हात, पाकिस्तानसोबत संरक्षण कराराची तयारी? बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेने वाढली चिंता
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मागील काही काळ...
Continue reading
Bank Strike: ११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संप; सणासुदीच्या काळात बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता
Bank Strike News: देशभरातील बँक ग्राहकांसाठी...
Continue reading
भाजपला धक्का! स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता थलपती विजय यांच्या पक्षात प्रवेशाची शक्यता
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता आणि राजकारणी थलपती सी. जो...
Continue reading
Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई होणारच; मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितली A टू Z प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्य...
Continue reading
CM Vijay: LPG सिलिंडरबाबत विजय यांचा मोठा निर्णय; वर्षाला तीन मोफत सिलिंडर, 1.30 कोटी कुटुंबांना फायदा
CM Vijay News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि...
Continue reading
Gold Silver Rate: अरेरे! सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात; चार दिवसांत सोनं तब्बल 8,000 रुपयांनी महाग
Gold Silver Rate Today: सणास...
Continue reading
Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या दरासंदर्भात महत्त्वाची अपडेट; साखरेच्या वाढत्या दराचा परिणाम
शिर्डी : Shirdi तील साईबाबांच्या दर्शनास...
Continue reading
आणि टिकटॉक स्टार्सना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, या अफवेमुळे गेल्या आठवड्यात हिंसक
निदर्शने झाली होती. पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पोलिसांनी
हिंसा आणि तोडफोड करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांचीही ओळख पटवली आहे.
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि स्थानिक पोलिसांनी
आतापर्यंत 16 लोकांना अटक केलीये, ज्यात बहुतांश व्लॉगर्स आणि
टिकटॉक स्टार आहेत. या लोकांवर बलात्काराच्या कथित घटनेबाबत
अफवा पसरवल्याचा आरोप आहे. तोडफोड आणि हिंसाचारात सहभागी
असलेल्या इतर लोकांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले.
या घटनेबाबत खोट्या बातम्या पसरवणारी १३८ सोशल मीडिया खातीही
ब्लॉक करण्यात आली आहेत. FIA च्या माहितीनुसार सायबर क्राईम
विंगच्या तांत्रिक अहवालात 38 वरिष्ठ पत्रकार, वकील, व्लॉगर्स आणि टिकटॉक
स्टार्सनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कथित खोटा प्रचार शेअर करून
लोकांना सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी प्रवृत्त
करत आहेत. लाहोरमधील एका महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीवर
केलेल्या कथित बलात्काराच्या बातम्यांवरून पंजाबच्या विविध शहरांमध्ये
गेल्या आठवड्यात व्यापक निदर्शने झाली, ५० हून अधिक विद्यार्थी जखमी
झाले आणि सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी 600 हून अधिक
विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी स्थापन
केलेल्या तपास समितीने महाविद्यालयात बलात्कार झाल्याची पुष्टी केली नाही
आणि प्रत्यक्षदर्शीही सापडला नाही. समितीने सुमारे 28 विद्यार्थ्यांची मुलाखत
घेतली, ज्यांनी सांगितले की त्यांनी या घटनेबद्दल इतर लोकांकडून ऐकले आहे.
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हे प्रकरण खळबळ माजवल्याचे अहवालात
म्हटले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने
तुरुंगात टाकून सोशल मीडियावर या प्रकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा
आरोप मरियम नवाज यांनी केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/triple-fight-in-murtijapur/