*तीन वाहनांचा विचित्र अपघात, पाच प्रवाशांचा मृत्यू, तर पंधरा प्रवासी जखमी*

*तीन वाहनांचा विचित्र अपघात, पाच प्रवाशांचा मृत्यू, तर पंधरा प्रवासी जखमी*

अजिंक्य भारत ब्रेकिंग

खामगाव-शेगाव रोडवर भीषण अपघात घडला असून, तीन वाहनांचा समावेश असलेल्या

या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Related News

शेगावकडून खामगावकडे येणारी बोलेरो गाडी आणि खामगावहून शेगावकडे जाणारी

खाजगी प्रवासी ट्रॅव्हल यांच्यात आज सकाळी जयपुर लांडे ब्रीज आणि सिद्धिविनायक टेक्निकल

कॅम्पसच्या जवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत गंभीर नुकसान झाले असताना,

त्याचवेळी मागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्लीपर बसने ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात बोलेरोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रॅव्हलमधील

एक प्रवासी मृत झाला आहे. तसेच, बोलेरो आणि ट्रॅव्हलमधील

एकूण पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण

पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

जखमींना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,

त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

Related News