सध्या मध्यपूर्वेत स्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत, तर इराणकडूनही थेट प्रत्युत्तर मिळत आहे. इराणमधील लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरू असून युद्ध अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संबंधित देशांमधील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. पॅलेस्टाइन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि UAE (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा प्रयत्न करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
कामानिमित्त दुबईमध्ये गेलेल्या पुणे जिल्ह्यातील १० नागरिक आणि पिंपरी-चिंचवड येथील इंदिरा कॉलेजचे ८० विद्यार्थी व ५ शिक्षक सध्या सुरक्षित आहेत, तसेच त्यांच्या व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आपत्कालीन संपर्क नंबर जाहीर केले आहेत. रामल्लाहसाठी +९७०५९२९१६४१८, दोहा (कतार) ००९७४-५६४७५०२, रियाध ००-९६६-११-४८८४६९७, अबू धाबी ८००-४६३४२ किंवा WhatsApp ९७१५४३०९०५७१, कुवैत +९६५६५५०१९४६, मस्कत ८००७१२३४ किंवा +९६८९८२८२२७०, जॉर्डन ००९६२-७७०४२२२७६, बगदाद +९६४७७१६५१११८५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
भारतीय नागरिकांनी गर्दीपासून दूर राहावे, वाहतुकीच्या सुरक्षित मार्गांचा वापर करावा, आपत्कालीन संपर्कांशी सतत संपर्क ठेवावा आणि तणावपूर्ण परिस्थितीत घराबाहेर जाणे टाळावे. या सूचना पालन केल्यास सुरक्षित राहण्यास मदत होईल.
Related News
पेट्रोलनंतर विमानाच्या इंधनातही इथेनॉल? सरकारने अखेर खरं काय ते स्पष्ट सांगितलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? हेलिकॉप्टर आणि विमान आले समोरासमोर
Waterfall Trip Safety: धबधब्याच्या ट्रिपला जाताय? ही 5 जबरदस्त लाइफसेव्हिंग गॅझेट्स तुमचा महागडा फोन आणि सामान सुरक्षित ठेवतील!
मुंबई Rain Alert: पुढील 3 तासांचा गंभीर धोका, 4 Powerful Apps देतील Live अपडेट्स आणि सुरक्षित प्रवासाची माहिती
अकोल्यात गजानन महाराज पालखीसोबत रस्ता सुरक्षा जनजागृती; 5 नियमांनी हजारो भाविकांना दिला ‘सुरक्षित प्रवासाचा’ शक्तिशाली संदेश
इराणमधील सत्तासंघर्ष तीव्र; युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवीन नेतृत्वाबाबत अनिश्चितता
“भीषण युद्धछाया! इस्रायलचा लेबनानवर खळबळजनक हवाई हल्ला; 7 जणांचा मृत्यू, 50 स्ट्राइकनंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला”
अलर्ट! 2 देश आमने-सामने, मध्यपूर्वेत तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली
“होर्मुझ संकट 2026: इराणचा जहाजांवर धक्कादायक हल्ला – जगात 5 मोठे परिणाम!”
दुबईतील पाम जुमेराह येथील आग; क्षेपणास्त्राच्या ढिगाऱ्यामुळे ४ जण जखमी
Railway प्रवास सुरक्षित, सोयीस्कर राहण्यासाठी नवीन नियम लागू
1 खतरनाक Bangladesh‑Pakistan Deal: संरक्षण सहकार्याचा धडाका
या परिस्थितीत केंद्र सरकार आणि स्थानिक दूतावास सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती मदत तत्काळ उपलब्ध करत आहेत.

