हैदराबाद: अमरावतीच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे वादात सापडल्या आहेत. राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राणा यांच्या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो, असं एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लतांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. ओवैसी बंधूंना कळणारही नाही ते कुठून आले आणि कुठे गेले,’ असं विधान राणा यांनी सभेत केलं.
‘एक लहान आणि एक मोठा भाऊ आहे. लहान भाऊ म्हणतो, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करु शकतो. त्या लहान भाऊला मला सांगायचंय, तुला १५ मिनिटं लागतील. आम्हाला तर केवळ १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. लहान-मोठ्याला कळणारही नाही कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेशी आहेत,’ असं राणा म्हणाल्या. हा व्हिडीओ राणा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांना टॅग केलं आहे.
Related News
Miguel Angel Lopez Dias Passes Away : प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टीरियो सीनियर यांचं निधन झालं आहे. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ कुस्ती खेळली.
WWE Wrestler Rey Misterio Sr Death ...
Continue reading
शपथ विधीसाठी सहपरिवार विधानभवनात पोहोचले आ. साजिद खान
अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी आपल्या आमदारकीची शपथ...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...
प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी
64.45 टक्...
Continue reading
राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली.
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
विरोधकांवर त्या...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.
सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहे
या ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष
केल्याचे समज...
Continue reading
या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात...
Continue reading
स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असा
एकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटक
दिनांक...
Continue reading
indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक
प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अॅप लॉन्च करत आहे.
या अॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट
,...
Continue reading
नवनीत राणा यांच्या विधानावरुन एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पलटवार केला आहे. ‘भाजपचे नेते निवडणूक सुरु असताना अशी विधानं करत आहेत. यामुळे नियमांचं, आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन होत आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणी कठोर कारवाई करायला हवी. या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो,’ असं पठाण म्हणाले.
नवनीत राणा यांच्यासारखी विधानं मी केली असती, तर आज मी तुरुंगात असतो, असं पठाण यांनी म्हटलं. ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं विधान अकबरुद्दीन ओवैसींनी केलं होतं. त्यानंतर ते स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाले. ४० ते ४२ दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मग त्यांनी न्यायालयात लढा दिला. मग या प्रकरणातून त्यांची सुटका झाली. आता तसंच विधान राणांनी केलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई कधी करणार? त्यांना तुरुंगात कधी पाठवणार?, असे प्रश्न पठाण यांनी उपस्थित केले आहेत.