जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम

सुधीर

जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम

अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे स्मृतिदिन दि. 5 डिसेंबर रोजी अकोट तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस स्व. सुधीर पाठक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या लेखणीतून प्रेरित होऊन घडलेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला. तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दीपक देव, अशोक झामरे, संजय आठवले, रामदास काळे, राजेश डांगटे, अरुण काकड, राहुल कुलट, प्रकाश कुकडे, तसेच स्व. सुधीर पाठक यांचे मित्र विजय अस्वार, वासिम अहमद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात पत्रकारांनी आपल्या भाषणांत स्व. सुधीर पाठक यांच्या आठवणींना उजाळा दिला. विशेषतः ग्रामिण जीवन, कृषी, आणि शिक्षण या क्षेत्रातील त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले गेले. त्यांच्या लेखणीतून समाजात जागरूकता निर्माण झाली असून अनेक सकारात्मक बदल घडले, असे अनेकांनी सांगितले.

Related News

या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार अभिषेक पाठक आणि अनिकेत पाठक यांनी केले, तर राहुल कुलट, मुजीब शेख, आणि राजपाल लबाडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन निलेश पोटे यांनी केले.

पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार

स्व. सुधीर पाठक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अकोट तालुक्यातील पत्रकार रामदास काळे, किरण भडंग, मुकुंद कोरडे, नितीन तेलगोटे, सोनू सावजी, अरुण काकड, स्वप्नील सरकटे, प्रकाश गायकी, अशोकराव झामरे, चंचल पितांबरवाले, प्रकाश कुकडे, विनोद वसू, हर्षल कोल्हे, विजय जितकार, पवन बेलसरे, अहमद शेख, गणेश वाकोडे, विशाल गवई, राजेश साळुंके, धीरज बेलसरे, बबलू खान, वासिम अहमद खान, संजय डोंगरे, दामू कपले, धन्नु बायवार, विठ्ठल येवोकार यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्व. सुधीर पाठक यांची पत्रकारितेतील छाप

स्व. सुधीर पाठक हे शोध पत्रकारितेसाठी ओळखले जात होते. त्यांनी भाषाशैलीला बोलीभाषेतून नवशब्दांची निर्मिती करून विशेष ओळख मिळवली. ‘रानकसाई’ हा शब्द त्यांच्या लेखणीतून प्रसिध्द झाला व वऱ्हाडापासून मुंबईपर्यंत लोकप्रिय झाला. याशिवाय ‘खारपणपट्टा’ या शब्दाची ओळख त्यांनी दिली आणि तो आजही वर्तमानपत्रांमध्ये वापरला जातो.

त्यांचे बँक बॅलन्स जरी शून्य असले, तरी लोकभावनेत ‘थॅन्क्स बॅलन्स’ भरपूर होते, असे त्यांच्या सहकारी मित्रांनी सांगितले. त्यांनी ग्रामीण तसेच शहरातील अनेकांना पत्रकारिता शिकवली, मार्गदर्शन केले आणि आजही त्यांच्या आठवणींमुळे चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येते.

स्व. सुधीर पाठक यांचे योगदान पत्रकारितेत एक प्रेरणास्त्रोत आहे, आणि त्यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाने त्यांची आठवण उजळून धरली.

read also : https://ajinkyabharat.com/there-is-no-need-for-bosss-approval-no-payment-for-menstruation-for-women-employees-smfg-india-credits-initiative/

Related News