“विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादीला, महायुतीला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्राच्या इतिहासातीत सर्वात जास्त बहुमत असलेलं सरकार स्थापन झालं.
या पार्श्वभूमीवर पुढच्या पाच वर्षांची वाटचाल कशी असेल? पक्षाला अजून बळकट कसं करायचं? कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? या विषयी विचारमंथन होईल” असं प्रफुल पटेल म्हणाले.
“राष्ट्रवादीच दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. बाबांचा आशिर्वाद घेऊन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. या प्रतिष्ठानने खूप चांगलं काम केलय.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
खूप विकास या परिसराचा झालाय. त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला गोरगरीबांना मिळत आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच आजपासून शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरु होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अधिवेशाच स्वरुप काय असेल? कुठल्या मुद्यांवर चर्चा होणार? यावर ते बोलले.
“राजकीय पक्ष सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काही ना काही दिशा, धोरण याची सूचना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी अनेक घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही.
पण त्यानंतर विधानसभेला चांगलं यश मिळालं” असं त्यांनी सांगितलं. “विधानसभेनंतर आता महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा विविध संस्थांच्या निवडणुका आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मुंबई, दिल्लीशिवाय गाव, जिल्हा नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे.
उद्याची दिशा काय राहील यावर दोन दिवस चर्चा होईल” असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार की महायुती म्हणून?
या प्रश्नावर प्रफुल पटेल म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका असतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/nationalist-congress-star-campaigner-for-delhi-assembly-yadi-zaheer-ajitdada-parth-pawar-with-or-veteran-navancha-inclusion/