गुजरातमधील दाहोद येथे सोमवारी आयोजित जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “जो सिंदूर मिटवेल, त्याचं मिटणं ठरलेलं आहे.”
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मोदी म्हणाले की, २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी एका पित्याला त्याच्या मुलांसमोर गोळ्या घालून ठार केलं.
हे फक्त त्या पित्याचं नव्हे तर १४० कोटी भारतीयांचं आव्हान होतं.
मोदी पुढे म्हणाले, “मोदीशी लढणं किती कठीण आहे, हे दहशतवाद्यांनी स्वप्नातसुद्धा विचारलं नव्हतं.
मी माझ्या तीनही सेनांना मोकळीक दिली आणि त्यांनी ६ मेच्या रात्री २२ मिनिटांत ९
मोठ्या दहशतवादी ठिकाणांचं उच्चाटन केलं.” पाकिस्तानने दुस्साहस
केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी पोस्ट्सवरही कठोर कारवाई केली.
अकल्पनीय निर्णय घेणारी सरकार – मोदी
मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, “आमच्या सरकारने अभूतपूर्व आणि
अकल्पनीय निर्णय घेतले आहेत.
दशकांपासूनच्या बंधनांना तोडून भारत आज स्वनिर्मितीत आघाडीवर आहे.”
भारतात आता स्मार्टफोन, खेळणी, औषधे, सैन्याची शस्त्रास्त्रे, रेल्वे आणि
मेट्रोसारखी तंत्रज्ञानं तयार होऊन जगभरात निर्यात केली जात आहेत.
वलसाड-दाहोद ट्रेनचा शुभारंभ
गुजरात दौऱ्यात मोदींनी वलसाड-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि दाहोद
येथील लोको मॅन्युफॅक्चरिंग युनिट राष्ट्राला समर्पित केलं. यामुळे वलसाड,
वापी आणि आसपासच्या भागात काम करणाऱ्या दाहोदच्या लोकांना प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
रेल्वे आणि नागरी विकासाचे अनेक प्रकल्प
रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या
नवीन प्रकल्पांची माहिती देण्यात आली. यामध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन आणि
नवीन उत्पादन युनिट्सवर काम सुरु असल्याचंही सांगण्यात आलं.
२२,०५५ घरांचं उद्घाटन व रिवरफ्रंट विकास
पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,००६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या
२२,०५५ घरांचं उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते साबरमती
रिव्हरफ्रंटच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही करतील, ज्यावर १,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahinya-dhukyachi-chadar/