बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेची ” तालूका चॅम्पीयन ” बनण्याची परपंरा कायम…!

बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेची " तालूका चॅम्पीयन " बनण्याची परपंरा कायम...!

मूर्तिजापूर – अकोला जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक सत्र २०२४ साठी दिनांक

२ जानेवारी रोजी तालूकास्तरीय शालेय बालक्रिडा स्पधेचे आयोजन संत गाडगे बाबा क्रिड संकुल येथे आयोजन करण्यात आले होते.

अशातच बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून विजयाची परंपरा कायम ठेवत ” तालूका चॅम्पीयन ”

Related News

बनण्याचा मान मिळविला आहे.
किडा संकूलावर पार पडलेल्या सामन्यांमध्ये बिडगाव शाळेने किक्रेटमध्ये प्रथम विजेता, कबड्डी मुली प्रथम, कबड्डी ज्युनिअर प्रथम,

लंगडी प्रथम, खो खो उपविजेता ह्या सांघिक प्रकारात विजेतेपद कायम ठेवले. वैयक्तिक क्रिडा प्रकारात ४०० मी, २०० मी दौड

,४०० मी टप्पा भाला फेक, गोळा टॅनेकाईट बॅडमिंटनसह सर्वच प्रकारात उत्तम कामगीरी करत जिल्हा स्पर्धेसाठी सुद्धा पात्र ठरली.

बिडगावच्या विजयी संघाला गटशिक्षणाधिकारी संजय मोरे, क्रिडा समन्वयक कैलास सोळंके, किडा कार्यवाहक

सरदार यांचे हस्ते चॅम्पीयन ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक पी.एन.इंगळे, केंद्रप्रमुख सुनिल तायडे यांचे मार्गदर्शनात प्रदिप मेहरे, सतिष सोळंके, गजानन शिंदे, मारोती पांडे,

कु.गवई मॅडम, संजय वानखडे या शिक्षकांनी विजयासाठी परिश्रम घेतले. यासाठी शा.व्यवस्थापन समिती बिडगांव पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/cattle-imported-for-illegal-slaughter-fraud-with-police/

Related News