निंबा-अंदुरा सर्कलअंतर्गत मोखा–जानोरी मेड गट ग्रामपंचायतीत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासकीय गोंधळाचे चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून उपसरपंच पद रिक्त असून आजपर्यंत संबंधित पदभरतीची कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. मोखा ग्रामपंचायतीत सात + एक असे एकूण आठ सदस्य असून त्यापैकी सहा महिला आणि दोन पुरुष सदस्य आहेत. मात्र, पंचायत कारभारात पुढाकाराचा अभाव आणि अंतर्गत विसंवादामुळे गावातील मूलभूत कामे ठप्प झाल्याची परिस्थिती आहे.
ग्रामसभा होत नाही, मूलभूत सुविधांची दुरवस्था
ग्रामपंचायतीत वेळेवर ग्रामसभा न घेण्यामुळे गावातील विकासकामांबाबत निर्णयप्रक्रिया प्रलंबित आहे. कचरापेटींचे वितरण झाले असले तरी घंटागाडी फक्त एक आणि गावे दोन असल्याने कचरा व्यवस्थापनाची समस्या कायम आहे. हा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून नागरिकांच्या नाराजीचा केंद्रबिंदू ठरला आहे.
नाली साफसफाईचा प्रश्न गंभीर – आरोग्य धोक्यात
मोखा व जानोरीमधील नालींची साफसफाई महिनोनमहिने रखडली असून वारंवार तक्रारी करूनही काम होत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
काजी खेळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर शेख, कर्मचारी जरांगे, आशा स्वयंसेविका करुणाबाई परघर मोर यांनीही ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्याचे समजते. तरीदेखील नाली साफसफाईचे काम सुरु झाले नाही.
Related News
पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा गावात घरकुल योजनेच्या फायद्याचा गैरवापर करून लाभार्थ्याने मुख्य ये–जा करण्याच्या रस्त्यावर मोठे घरकुल बांधले असून, यामुळे गावकऱ्यांना ...
Continue reading
महाराष्ट्रातील मूर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत शेरवाडी (शेलूवेताळ) येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २४ लाख रुपयां...
Continue reading
सावरा प्रतिनिधी – रंभापुर फाटा ते अकोट रोडवरील रस्त्याची दुरावस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सध्या या रस्त्यावर काम सुरू असल्याचे दिसते,...
Continue reading
अकोला – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १ मार्च, रविवार रोजी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत अकोला शहरातील गुरांचा बाजार समोरील अकोला-बाळापूर रोडच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवण...
Continue reading
परभणीत महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी केलेल्या युतीचा परिणाम आता स्पष्ट झाला आहे. हिंदुत्ववादी शहर म्हणून ओळख असलेल्या परभणीत महापौरपदी ठाकरे गटाने मुस्लिम...
Continue reading
मोखा-जानोरी मेळ गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जानोरीमेड गावातील वार्ड क्रमांक १ मध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर...
Continue reading
पुंडा | प्रतिनिधी – दिपक दाभाडे
पुंडा गावात अनेक महत्त्वाच्या शासकीय पदांवर कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची कामे अक्षरशः ठप्प झा...
Continue reading
तेल्हारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत वारी पिंपरखेडने आपल्या परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रांच्या बांधकामासंदर्भात गंभीर पावले उचलली आहेत. सरपंच सौ. मी...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
Mumbai महापालिका निवडणूक: संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना ११ लाखांचा खुला चॅलेंज; “धार्मिक वादाशिवाय निवडणूक लढवा”
मुंबई : Mumbai महानगरपालिकेच्या आ...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निगूर्णा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची गंभीर घटना समोर आ...
Continue reading
स्थानिक नागरिक देवराव परघर मोर यांनी सांगितले की,
“कर्मचारी जरांगे यांनी ग्रामसेवक, सरपंच व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना नाली साफ करण्याबाबत आग्रहपूर्वक सांगितले. काम करण्यास त्यांनी होकारही दिला, मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.”
नागरिकांची मागणी :
रिक्त उपसरपंच पदाची तात्काळ भरती करावी
नाली साफसफाई तातडीने करून दोन्ही गावात स्वच्छता राखावी
ग्रामपंचायतने कारभार सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत
मोखा–जानोरी परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत असून ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
read also : https://ajinkyabharat.com/honorary-doctorate-of-washington-university-awarded-to-rahul-kulat-akotcha-gaurav-wadhala/