राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे,
महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक
कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कालच एसटी कर्मचाऱ्यांनी
संपाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक डेपोत
एसटी बसेस उभ्या राहिल्या असल्याचे दिसत आहे. पहाटेपासूनच या
संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अकोला, अमरावती ,
अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातून एसटी बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
पहाटेपासूनच एसटी स्थानकावर प्रवशांची गर्दी दिसून येत आहे.
अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अनेक
प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अनेक एसटी कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केल आहे.
त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्या प्रलंबित
मागण्यासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी 2021 मध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन
संप पुकारला होता. तेव्हा तब्बल 54 दिवस एसटी बस थांबली होती. आता ऐन
गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी
गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव राज्यभरात साजरा केला जाणारा आहे. त्याआधीच एसटी
कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरात नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
एसटीचे तिकीट बुक करून अनेकांनी गणेशोत्सवात गावी जाण्याचे नियोजन आखले आहे.
जर, संप जास्त दिवस सुरू राहिला तर नागरिकाना गावी जाता येणार नाही.
एस टी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी कामगारांनी राज्यभरात
निदर्शने करण्यास सुरूवात केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/paralympics-indias-second-gold-medal/