नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
Related News
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
एक बाई काय बोलली, तुम्ही तुटून पडता? आम्ही खोलात गेलो तर… शिरसाटांचा ठाकरे गटावर पलटवार
बुडत्याचा पाय खोलात! शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार; Nifty कोसळण्याच्या उंबरठ्यावर
मुंबई तापली, पाणीसाठा कमी! महापालिकेचं मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
“रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी: रेशनसोबत मिळणार खास गिफ्ट!”
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे.
गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं.
आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली.
त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे.
शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.
महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये
लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये
शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये