आर्णी नगरपरिषदेत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेसची युती; सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

भाजप–शिवसेना

आर्णी (ता. आर्णी) – आर्णी नगरपरिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची युती होऊन लवकरच सत्तास्थापना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या युतीमुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले असून, आगामी काळात विकासाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस साजिद बेग यांनी युतीची माहिती दिली. आर्णी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याने ही युती करण्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटवार, जिल्हा सरचिटणीस सुरेश मोरलेवार, शहराध्यक्ष रामेश्वर चौधरी उपस्थित होते. त्यांनी युतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे स्पष्ट केले.

Related News

शिवसेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू उकंडे आणि तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी आपली भूमिका मांडली. आर्णी शहराच्या विकासासाठी शिवसेना ही नेहमीच कटिबद्ध असून, युतीच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या वतीने माजी शहर अध्यक्ष विशाल देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र राठोड, VJNT जिल्हाध्यक्ष विपिन राठोड यांनी युतीला पाठिंबा दर्शवला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ आर्णी शहराला मिळवून देण्यासाठी युतीचे नगरपरिषद प्रशासन प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. श्यामसुंदर गुटे, निवृत्त तहसीलदार श्याम झळके यांचीही उपस्थिती होती. त्यांनी युतीच्या निर्णयाचे स्वागत करत, नगरपरिषदेत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस या युतीमुळे आर्णी नगरपरिषदेत स्थिर सरकार येणार असून, शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. आगामी काळात सत्तास्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे विदर्भ समनवयक प्रमोद कुदळे, शिवसेना आर्णी शहर प्रमुख सुरेश पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिगंबर बुटले, शिवसेना आर्णी विधानसभा प्रमुख जाकीर सोलंकी,राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक संजय व्यवहारे, अनंता गावंडे, विलास पाटील राऊत, नगरसेवक परसराम कुमरे, अभिलाष इंगोले, नितेश गावंडे, मोईबशेख, सादिक शेख (कॉन्ट्रॅक्टर), श्याम ठाकरे,माजी ग्रामपंचायत मेंबर अन्वर भाई ,माजी ग्रामपंचायत सदस्य शरीफ शेख, शिवसेनेचे रघुनाथ मुंडवाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युनूस शेख,निलेश बुटले,निलेश गावंडे,बंटी जाधव, भाजप चे प्रमोद आडे,यांच्या सह शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/raigad-crime-alert-nelan-junglet-under-the-pretext-of-showing-horses-7-shocking-facts-about-inhuman-acts-in-neral/

Related News