मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

अमरावती: जादूटोना करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेसोबत झालेल्या अमानुष वागणुकीच्या

संदर्भात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि जिल्हाधिकारी सौरव कटियार

यांनी पीडित महिलेच्या गावी रेट्टयाखेडा येथे भेट दिली. यावेळी पीडितेची आणि नातेवाईकांची विचारपूस केली.

Related News

तसेच यावेळी त्यांनी वृद्ध महिलेकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

या प्रकरणात गावातील पोलीस पाटील यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

तर भविष्यात गावामध्ये अशाप्रकारे प्रसंग घडू नये यासाठी प्रशासनातर्फे उद्या 21 जानेवारी

रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. अशातच मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या

आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/dead-body-of-a-60-year-old-woman-in-trident-hotel-on-marine-drive/

Related News