ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;

ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;

मुंबई | वाढत्या घरांच्या किमतीमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये घर खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.

मात्र, घराच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे.

म्हाडाकडून (MHADA) जुलै 2025 मध्ये ठाणे आणि कल्याण परिसरात सुमारे 4,000 घरांची बंपर लॉटरी जाहीर होणार आहे.

Related News

कोकण मंडळाकडून लॉटरीची तयारी

2024 नंतर ही म्हाडाची सर्वसामान्यांसाठीची मोठी लॉटरी आहे.

यावेळी कोकण विभागात ही लॉटरी राबवली जाणार असून, घर खरेदीसाठी इच्छुक

नागरिकांसाठी ही मोठी संधी आहे. सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असतील.

  • चितळसर येथे म्हाडाने उभारलेल्या 1173 घरांचा समावेश

  • कल्याणमध्ये सुमारे 2500 घरांची लॉटरी होणार

  • एकूण मिळून 4000 घरांची बंपर लॉटरी

मुंबईतही दिवाळीपूर्वी लॉटरी

या व्यतिरिक्त म्हाडाकडून मुंबई मंडळात सुमारे 5000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यभरात 19,497 घरांचे उद्दिष्ट

2025-26 च्या अर्थसंकल्पात म्हाडाने एकूण 19,497 घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यामध्ये मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या मंडळांचा समावेश आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bsf-jawan-purnam-kumar-shaw-yanchi-pakistanatun-safe-return/

Related News