सरकारचे टेन्शन वाढले? अभिजीत दिपके यांच्या घरी CJP ची महत्त्वाची बैठक; 15 ते 20 प्रमुख सदस्यांची उपस्थिती, पुढील रणनीतीवर चर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची बैठक; E20 इंधन, आंदोलनाची दिशा आणि आगामी भूमिका ठरणार
छत्रपती संभाजीनगर : नीट (NEET) पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर देशभरात चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला देशभरातील 15 ते 20 प्रमुख सदस्य उपस्थित राहणार असून, पक्षाच्या पुढील आंदोलनाची दिशा, धोरण आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवरील भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनामुळे CJP देशभर चर्चेत आली होती. या आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. त्यानंतर अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
आंदोलनानंतर वाढल्या राजकीय घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळाला. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी अधिक चर्चेत आली.
Related News
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग! सुनेत्रा पवारांचं होणार ‘रिलाँचिंग’; ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ कॅम्पेनची चर्चा
Disha Salian प्रकरणावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
Kapil Sharmaच्या शोचा नवा सीझन जाहीर; 26 सप्टेंबरपासून पुन्हा रंगणार ‘हंसी का त्योहार’
‘Dhurandhar’ पाहिलास का? शाहरुख खानने अखेर दिलं उत्तर; म्हणाला, ‘दोन्ही भाग खूप आवडले’
रात्री मोबाईल उशाजवळ ठेवून झोपता? कॅन्सरबाबतचा दावा किती खरा? जाणून घ्या सत्य
जीआर आला! मराठा आरक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल; शिंदे समितीला नवी जागा
421 दिवसांपासून OTT टॉप 10 मध्ये ‘Mirzapur’; अजूनही प्रेक्षकांची पहिली पसंती!
Bigg Boss 20 : अवघ्या 5 महिन्यांत बादशाहसोबतचं नातं तुटलं; ईशा रिखीने सांगितलं नेमकं काय बिनसलं?
Tukaram Mundhe च्या पत्राने खळबळ! 11 रुपयांचा IV सेट रुग्णांना 325 रुपयांना
BRICS परिषदेत गैरहजेरीनंतर बांग्लादेशला भारताचा ‘दणका’? उच्चायुक्तांच्या नियुक्तीवर अद्याप निर्णय नाही
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलारांच्या दाव्याने खळबळ
शरद पवार मैदानात! ऐन गणेशोत्सवात राष्ट्रवादीची तातडीची बैठक; नेमका काय निर्णय होणार?
आंदोलनानंतर अभिजीत दिपके काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या घरी परतले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने समर्थक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. आता त्याच निवासस्थानी पक्षाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेतील कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विदेशातील निधीवरून प्रश्न उपस्थित
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीला विदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याचे आरोप काही स्तरांतून करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अभिजीत दिपके यांच्या शिक्षणासाठी किंवा विदेशातील वास्तव्यासाठी आर्थिक मदत कुठून आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे पत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या आरोपांबाबत अभिजीत दिपके किंवा कॉकरोच जनता पार्टीकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
15 ते 20 प्रमुख सदस्यांची उपस्थिती
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील विविध राज्यांतील CJP चे 15 ते 20 प्रमुख सदस्य या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. बैठकीसाठी संबंधित सदस्यांना संदेशही पाठविण्यात आला आहे.
या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी आंदोलनांची रूपरेषा, देशभरातील विस्तार, विद्यार्थी प्रश्न, रोजगार, शिक्षण व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक केवळ संघटनात्मक नसून पुढील काही महिन्यांतील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते.
E20 इंधनाच्या मुद्द्यावर CJP ची भूमिका काय?
सध्या देशात E20 इंधनाचा मुद्दा चर्चेत आहे. वाहनचालक, शेतकरी आणि विविध संघटनांकडून या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर CJP देखील या विषयावर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत E20 इंधनाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका निश्चित होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या विषयावर भविष्यात आंदोलन करायचे की जनजागृती मोहीम राबवायची, याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या मोर्च्याकडेही लक्ष
दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर CJP ने कोणती भूमिका घ्यायची, स्वतंत्र आंदोलन करायचे की इतर संघटनांसोबत समन्वय साधायचा, यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या पुढील धोरणांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. संघटनात्मक विस्तार, आगामी आंदोलने, विविध सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवरील भूमिका तसेच नव्या अभियानांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांची माफी मागावी, अशी मागणी यापूर्वी केली होती. त्या मागणीवरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सध्या देशभरात CJP च्या पुढील पावलांकडे राजकीय वर्तुळासह विद्यार्थी संघटना आणि समर्थकांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणारी ही बैठक पक्षासाठी आगामी काळातील दिशा निश्चित करणारी ठरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
