तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि संपर्क प्रमुख आमदार गोपीकिशन
Related News
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केले.
स्थानिक संघटन बांधणी, निवडणूक तयारी, आणि सरकारी योजना
जनतेपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन यावर सखोल चर्चा झाली.
या वेळी शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला,
तसेच पक्षप्रवेश कार्यक्रमाचाही आयोजन करण्यात आला. हिवरखेड, दानापूर, आणि इतर
गावांतील नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
बैठकीला रहिवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, मनिष कराळे, जिल्हा
सचिव सतीश गोपनारायण, युवा सेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख पिंजरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पक्ष संघटना बळकट करणे
व महायुती सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचवणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट आहे.”
या बैठकीचे प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रविण वैष्णव,
सूत्रसंचालन प्रतिक पखान, आणि आभार शहर प्रमुख अनिकेत ढवळे यांनी मानले.