तेल्हारा तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली.
शहरासह हिवरखेड, अडगाव, पचंगव्हाण, तळेगाव बाजार, माळेगाव आणि
गोर्धा येथे मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा करून परस्परांना शुभेच्छा दिल्या.
Related News
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
विशेष नमाज आणि सामाजिक ऐक्याचा संदेश
तेल्हारा शहरातील जामा मस्जिदमध्ये सकाळी १० वाजता ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली.
नमाजनंतर हिंदू समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश दिला.
तळेगाव बाजार येथे सामंजस्याचा उत्सव
तळेगाव बाजार येथेही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
माजी पोलीस पाटील भाऊसाहेब खारोडे, मधुकरराव ठोंबरे, रावसाहेब खारोडे,
सदानंद खारोडे, उध्दव मानखैर, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर खारोडे,
हिंमत पाटील, सागर मानखैर, गोलू खारोडे, मयूर खारोडे आणि देवेंद्र भड
यांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती
या वेळी जामा मस्जिद अध्यक्ष रशिद शा, वायदभाई, मो. इदरिस, रफिकभाई, मुजफ्फर भाई,
क्षमाभाई, मो. सिद्दिक, साजिद खा, जम्मुभाई, नाशिरखा पठाण, बबलुभाई भुराभाई
यांच्यासह गावातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पोलीस बंदोबस्त आणि शांततेत साजरा झालेला सण
तालुक्यात ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोणत्याही अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही. संपूर्ण तालुक्यात शांतता, बंधुता आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सामाजिक सलोखा जपणारा आनंदाचा सण
या प्रसंगी हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येत सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचा संदेश दिला.
गोडधोड पदार्थांची देवाणघेवाण करत हा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.